बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान
बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म १९२० साली झाला. स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. […]