सुगंध पसरे चारही दिशा
सुगंध पसरे चारही दिशा, मधुसंचयाचा करत साठा, फुलाफुलांवर बहर केवढा, वारा वाही, सुवास खासा,–!!! फांदी फांदी डंवरून येई, फुलाफुलांनी लगडतसे, किमया सारी निसर्गाची, तोरणे सतत लावत असे,–!!! जंगी असे स्वागत एवढे, खास चालले कुणासाठी, कोण कोणासाठी झुरे,- -कोण अवतरे पृथ्वीवरती,—? सडा पडतो खाली फुलांचा, का घातल्या पायघड्या, रंगांची अशी मांदियाळी, अत्तराचे कोण शिंपी सडे,–!!! कोमल, मऊ, […]