द्रौपदी वस्त्रहरण
ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।। द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।। वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ धावूनी ये मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।। धावूनी आला […]