वर्क एन्व्हायरमेन्ट
जसजसे शहरात राहून तिथल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात नोकरीच्या मागे धावून धावून दमल्यावर स्वतःच्या मालकीची एखादी वन रूम किचन किंवा वन बी एच के पर्यंतच मजल पोहचते तेव्हा स्वतःची रूम असून सोसायटी किंवा गृहसंकुलात आपण मेंटेनन्स देऊन भाड्यानेच उपऱ्या सारखे राहतोय अशी भावना निर्माण होते, त्यावेळेस स्वतःच्या गावात, स्वतःच्या शेतात आणि शेतातल्या मातीत उन्हा तान्हा मध्ये का होईना पण राब राबून सुखाने पोट भर तरी खायला मिळत होते असे विचार येतात. […]