शिव ताण्डव स्तोत्रम् – मराठी अर्थासह
लंकेचा अधिपती रावण याचेबद्दल त्याच्या रामायणातीळ भूमिकेमुळे भारतातील अनेक लोकांच्या मनात अपसमज व अप्रीती दिसून येते. प्रत्यक्षात रावणाचे व्यक्तिमत्त्व खूपच भिन्न आहे. व्यापार,राज्यशास्त्र, आयुर्वेद,दर्शने,बुद्धिबळ यात तो पारंगत होता. संगीताचा रसिक दशानन रुद्रवीणेचा उत्कृष्ट वादकही होता. देवांना पराभूत करून बंदिवान करणारा शूरवीर रावण परम शिवभक्त होता. एक सक्षम राज्यकर्ता असलेल्या रावणाच्या लंकेची व जनतेची भरभराट झाली होती. काही अभ्यासकांच्या मते तो दशग्रंथी विद्वान होता. संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, अर्कप्रकाशम्, शिवतांडव स्तोत्रम् इ. रचना केल्याचे सांगितले जाते. […]