कार्यकर्ता सत्तू
(लेखक – ऍड. कृष्णा पाटिल, तासगाव, सांगली) साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरवशाचा कार्यकर्ता. आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूने. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलुख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव सत्तू…. […]
(लेखक – ऍड. कृष्णा पाटिल, तासगाव, सांगली) साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरवशाचा कार्यकर्ता. आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूने. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलुख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव सत्तू…. […]
गावच्या पाटलाला चुकून आलेलं निजामाचे पत्र, पत्र आल्याने गावभर होणारी चर्चा, पाटलाचे पटवाऱ्याला घेऊन हैद्राबादला जाणं, तिथे त्यांची पोलिसांनी केलेली धरपकड आणि मग सुटकेचा थरार. […]
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।। मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषन करिती प्रभूचे ।।३।। कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती […]
दी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती. […]
शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत, निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी, चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे, बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी, निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी, उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या, परि न सेवक तेथे आला […]
कालच्याच मर्सिर्डिस बसनी आज लंडनच्या सीटी टूरला सुरुवात झाली. दूतर्फा दिसणा-या इमारतीतील घरबांधणीची वैशिष्ठ्य सर्वांनाच आकर्षित करत वाह व्वा मिळवात होती. तपकिरी रंगाच्या विटांच्या बांधकामावर पांढ-या शुभ्र रंगाच्या आयताकृती खिडक्या, दरवाजे आणि स्वच्छ काचा हे सर्व एकत्रित फारच उठावदार दिसत होते. या इमारती फार टोलेजंग नाहीत परंतु लांबवर पसरलेल्या आहेत. बाल्कनी आत घेउन रुम वा जागा […]
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”! […]
नदीच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. टेकडीवर एक आंबामातेचे मंदीर होते. मंदिराकडे जायला डांबरी रास्ता होता आणि नदीच्या कडेने वर जाण्यासाठी पायऱ्या पण बांधलेल्या होत्या. खालून टेकडीकडे पाहताना हिरव्यागार डोंगरातून दिसणारा वर पर्यंत जाणारा नागमोडी रस्ता आणि ठिकठिकाणी बांधलेल्या कमानीतून वर जाणाऱ्या पायऱ्या यांचे खूपच मनोहारी दृष्य दिसत होते. मग सगळ्यांनी गाडी पायथ्याशी लावून पायऱ्या […]
लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला. थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला. हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं. […]
मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions