सिद्दाबाबाची खोली
सिद्दाबाबाच्या खोलीत स्त्रियांनी का जायचे नाही, हे जाणून घ्यायला अलकाला फारशी चौकशी करावी लागली नाही. गोष्ट तशी फार जुनी नव्हती, तीस एक वर्षां पूर्वीची. आणि जे काही घडले ते प्रत्यक्ष पाहिलेले अनेक साक्षीदार हयात होते. […]
सिद्दाबाबाच्या खोलीत स्त्रियांनी का जायचे नाही, हे जाणून घ्यायला अलकाला फारशी चौकशी करावी लागली नाही. गोष्ट तशी फार जुनी नव्हती, तीस एक वर्षां पूर्वीची. आणि जे काही घडले ते प्रत्यक्ष पाहिलेले अनेक साक्षीदार हयात होते. […]
तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत. […]
सांगावा सखे मिळाला जीव भेटीस आतुरला वाटे कधी पाहीन तुला निघालो बघ भेटायला तू गेलीस तिकडे अन जीव व्याकुळला इकडे जो भेटे तो मज विचारे असे काय झालं रे तुला दिवस जाई कसा बसा रात्र एकटी मोठी वाटे भकास आकाशात या चंद्र एक अकेला वाटे आसुसला जीव तुझा जाणीव मजला आहे निघालो तुज भेटाया अधीरता मनी […]
चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी कळले नाहीं मजला, ही त्याची रीत विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत उपास तापास करुनी, देह शुद्ध केला भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत […]
जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते. […]
नीलच्या ऑर्केस्ट्रा मध्ये येण्याने आरूच्या ऑर्केस्ट्राचा नावलौकिक वाढला होता. आरू आणि नील एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एके दिवशी आरुला सिग्नलवरच्या दुकानात आवडलेला निळा ड्रेस आणि ज्वेलरी नीलने आरुला भेट दिली. एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती. नीलने आरूला निळा ड्रेस घालून बीचवर भेटायला बोलावलं. नील तिला आज एक सरप्राईज देणार होता….
चला तर बीचवर काय घडतंय ते पाहायला…… […]
आईवडीलावर जिवापलीकडे प्रेम करणाऱ्या ,छोट्याश्या गोष्टीने आईबाबांना भरभरून आनंद देणाऱ्या त्यांच्या लाडक्या लेकी ह्या तुकडा असतात आई बाबांच्या काळजाचा……..अश्या या सर्व लाडक्या मुलींना Happy daughter’s day…….. […]
गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे । जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।। निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा । झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं । आज दुवा नसता सारे पडती पाठी ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे । वंशाने जे […]
आरुंधती परांजपे….. एक २५ वर्षे वयाची, दिसायला खूप सुरेख, हसऱ्या चेहेऱ्याची, आनंदी स्वभावाची, फॅशनची आवड असणारी मुलगी. शाळेत असल्यापासून तिला नाच, गाणं, नाटक याची आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. शाळेत असताना प्रार्थना, समूहगीते, गायन स्पर्धा यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार होती, त्यामुळे ‘आरुंधती’ ऊर्फ ‘आरू’ सगळ्यांची लाडकी होती. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions