नवीन लेखन...

भावना

आयुष्यात येवून ज्यांनी केल आमच भल (चांगल)।।त्यांच्यावरच जाताना टाकली आम्ही फूल ।। फूल टाकताना डोळ्यातून येत होत पाणी ।।तेव्हाच कानावर पडत होती अभंगाची वाणी ।। अभंगाची वाणी ऐकताना हाथ जोडोनी पडत होतो ।।पाया तेव्हाच मला दिसत होती माझ्या गुरुची छाया।। कवी :- सचिन राजाराम जाधव  मोबाईल नंबर:-8459493123

अफगाणिस्तानात भारताचे हितसंबंध जपण्याची गरज

अफ़गाणिस्तानात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यात अमेरिका भारत, पाकिस्तान, इराण आणि चीन हे प्रमुख देश आहेत. भारताने अफ़गाणिस्तानमध्ये आजवर केलेली गुंतवणूक काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तिथली संसद ,हेरात प्रांतात उभारलेलं ‘सलमा’ धरण भारत-अफ़गाणिस्तान मैत्रीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. […]

चि. मानसीस ( दिड वर्षाच्या नातीस )

थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   ||१|| उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   ||२|| युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   ||३|| अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   ||४|| चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   ||५|| किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   ||६|| […]

अजब न्याय नियतीचा

आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये…. […]

उंच इमारतींतील आग प्रतिबंधन

उंच इमारतीमध्ये आगीचा धोका निर्माण झाला तर ते आव्हान पेलण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाबरोबरच यंत्रणा उपलब्ध असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. उंच इमारतींची रचना करतानाच संभाव्य संकटाचा विचार करून आणीबाणीच्या काळात मदत करणे आणि आपदग्रस्तांची मुक्तता सुकर होईल अशी व्यवस्था आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियमावलीत सुधारणाही हव्यात. आगीची घटना घडली तर प्रत्यक्ष उपाययोजना बरोबरच इमारतीच्या रचनेतील वेगळेपण उपयुक्त ठरू शकते. […]

सुहास्य..

’हसणे’ ही एक उपजत, अफ़लातुन कला आहे. ती कुणी कुणाला शिकवत नसते, आणि शिकवता ही येत नसते. नैसर्गिक स्मितहास्यातून व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आपल्या हास्यशैलीवरून अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो. […]

माझी जीवलग सखी

तशी अगदी लहानपणापासून म्हणजे मला समज आल्यापासून माझी ही सखी माझ्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे माझ्या तसे उशीराच लक्षात आले. घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा माझ्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती माझी अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती. ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न… चिरतरुण… टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. […]

आदिदेव श्री गणेशा !!

महाबली बालेश अससी तूच दुरजा, महं महामती अंबिकेय श्री गणेशा, अवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन, शार्दुल मनोमया तुज साष्टांग वंदन…!!१!! ॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी, पार्वती अलक्ष इष्ट जननी, पाश-परशु-अंकुश हे शस्त्र, आखूरथ वाहे, नेसे पितांबरी वस्त्र…!!२!! यशस्वीन तु, भासे हरिद्ररूपी, गोल लंबोदर, चतुर्भुज वाढवी किर्ती, अवनीश मोहक कनिष्ठ इशानपुत्र, शोभले पिता पुत्रासी नाव भालचंद्र…!!३!! शिवानंदन म्हणुनी […]

माणसातल्या माणसाला मी शोधत होतो

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच याच सुखाच्या सपनात मी रमून […]

1 63 64 65 66 67 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..