निसर्गाची आनंदासाठी मदत
कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]