डायरी (कथा)
कोकणातल्या रत्नगिरी जिल्ह्यतील या एका छोट्या खेडेगावातील या घरात राहायला येउन तिला आज दहा दिवस झाले होते.मधुराचा नवरा शरद एका सरकारी बँकेत नोकरीला होता. काही दिवसापूर्वी त्याची बदली या गावात झाली होती. बँकेच्या एका खातेदाराच्या ओळखीने त्याला खूप कमी भाड्यात हे घर मिळाले होते. घर शहरापासून दूर व तसे एकाकी होते पण होते मोठे मजबूत अगदी चिरेबंदी वाड्यासारखे. […]