नवसाला पावणारा .. ‘रेडी’चा व्दिभुजा गणेश
महाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत. […]