आनंदात गाऊं
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ// बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आकाशांत पाहूं //३// […]