नवीन लेखन...

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

जगणे असते होरपळ

जगणे असते होरपळ, तना-मना-भावनांची, रोज रोज प्रत्येक पळ, जाणीव होई असुरक्षेची, षट्रिपुंचे जगात वर्चस्व, ते जनांवर हक्क गाजविती, माणुसकी करुणा अहिंसा, भावना थोर मागे पडती, सत्ता पैसा लालच,— अधिकार फक्त ठाऊक असती, कर्तव्य खाती कशाशी, कुंठित झालेली मती,–!!! असते कोणाचे कोण-? ना आई बापा विचारती, *अंधश्रद्धेखातर केवळ, लेकरेबाळे बळी देती*, सत्य सुंदर शिव, सगळ्यांना खुपसले पोटी, […]

मिठापरी जीवन

खारेपणा हा अंगी असतां,  कोण खाईल केवळ मीठ परि पदार्थाला चव येई,  मिसळत असता तेच नीट….१,   जीवन सारे खडतर ते,  भासते मिठासम मजला केवळ जीवन बघता तुम्हीं,  पेलणें अवघड सर्वाला..२,   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते हर घडीच्या प्रसंगामध्ये,  समाधानाचे अंकूर फूटते….३   डॉ. भगवान  नागापूरकर ९००४०७९८५०    

निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा

लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्‍या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्‍या संस्‍कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्‍यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्‍यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्‍यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय. […]

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,  या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई,  तेथ कुणाची कल्पकता धगधगणारे अंगारे हे,  जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी,  येईल कधी का समज मर्मा वरती घाव बसता,  सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे,  हलके हलके जाती मिटूनी त्या दु:खीताला जाणीव असते,  जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी समरस होतो,  इतर […]

सौंदर्य..

बाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात……. […]

झाड आहे झुकलेले

झाड आहे झुकलेले, कमरेत थोडे वाकलेले , असून इतके बहरलेले, लीन होऊन सदैव नमले, किती पाहिले पावसाळे, केवढे उन्हाळे सोसले, शिशीरी गारठून गेले, हेमंती पुन्हा सावरलेले, केवढी वादळे, वारे आले, पावसात झाड भिजले, तरीही निश्चल खडे राहिले, कुणी आले घांव घातले, नाग सापांचे विळखे पडले, मुंग्यांनी बुंध्याला वारूळ केले, झाड निमूट स्थिर राहिले, कोणी तोडली त्याची […]

डोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर!

सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे. […]

सुसंगती..

आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की,  अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात… […]

1 76 77 78 79 80 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..