गुणधर्म
करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे मात करूनी विचारावरती […]