नवीन लेखन...

  नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  । वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  । ठेवी […]

आपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल

हृदय शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव. विशिष्ट मांसाने बनलेला. त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाघात घडतो. […]

चाफा आणि मोगरा

चाफा आणि मोगरा गंधर्व कुठले हे, धरातलावर येऊन, सर्वांस मोहवती खरे, शापित म्हणू त्यांना तर सुगंधाच्या राशी, जो तो कुरवाळे त्यांना, घेऊन थेट हृदयाशी, –!!! हिमगौरी कर्वे ©

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते. […]

असाच पाऊस झिम्माड

असाच पाऊस झिम्माड वाहते रस्ते गळकी झाडं पक्षी घरट्यात माणसं बिऱ्हाडात सगळं शांत निवांत … अंतरात.. आसमंतात तू म्हणालास… एक आठवण जगावी कोसळणाऱ्या पावसाची चिमटीत धरून सोडावी तशीच बोट कागदाची हातावर थेंब झेलत गोल गोल राणी म्हणावं तसंच लहान होऊन गोधडी गुरफटून झोपावं पाऊस तुझ्या मनात पाऊस माझ्या डोळ्यात झरत होता झरझर उलगडत अंतर अचानक तू […]

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !

महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ? […]

मुंगी

मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

तुझे माझे नाते

तुझे माझे नाते, दुःखाचे दुःखाचे,— पोळलेल्या जिवांचे, व्यथित अशा हृदयांचे,–!!! तुझे माझे नाते, एकाच अखंड बंधाचे, अगदी जन्मोजन्मीच्या, गोड ऋणानुबंधाचे, विचरशी तू सहचरे, पण वेगळेच हे धागे, काळजाच्या विणींचे समसुखाचे, समदु:खाचे,–!!! ओघळलेल्या अश्रूंचे, आत लपलेल्या समुद्राचे, खोलवरच्या भोवऱ्याचे, उसळणाऱ्या लाटांचे, तुझे माझे नाते, दुःखाचे दुःखाचे,—!!! कधी भरतीओहोटीचे, दोघातल्या ओढीचे, वाचणाऱ्याला बुडवणारे, बुडणार्‍याला वाचवणारे, पाण्याशी जीवनाचे, निष्ठूर […]

अनाहता, अनादि-अनंता

अनाहता, अनादि-अनंता, वाहिले तुज मी चित्ता , व्हावी तुझी मजवरी कृपा, हीच उरी आंस बाळगतां,–!!! शरण तुज आले रे दयाघना, तनमन मस्तक नमवितां, तुजकारणी देह पडावा, आठवते तुज कृपाकरा,–!!! तुज पायी वाहिल्या मी, अनेक अरे वेदना, काय सांगावे दुःख, किती भोगाव्या यातना,–!!! शरीर, मानस झिजवतां, नच मिळे सुख पण वंचना जावे कुठे सांगावे कोणा, देव मानती […]

चिमणीची निद्रा मोड

‘पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी…..१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी….२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.’..३, ‘ उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी…..४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप आवाज करूनी’ …..५ डॉ. […]

1 84 85 86 87 88 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..