नवीन लेखन...

दया प्रेम भाव

दया प्रेम हे भाव मनी,  जागृत कर तू भगवंता तुला जाणण्या कामी येईल,  हृदयामधली आद्रता शुश्क मन हे कुणा न जाणे,  धगधगणारे राही सदा शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा पाझर फुटण्या प्रेमाचा तो,  भाव लागती एक वटूनी उचंबळणारे ह्रदय तेथे,   चटकन येईल मग दाटूनी दया प्रेम या भावांमध्ये,  दडला आहे ईश्वर तो मनांत येता […]

दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

जर तुम्हाला वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात. […]

देवघरात तेवते शांत

देवघरात तेवते शांत, प्रशांत अगदी समई, ज्योत स्थिर होत, अचल जशी राही,— केवढा त्याग तिचा, दुसऱ्यासाठी समर्पण, दुनियेला या प्रकाशत, केले जीवन अर्पण,— कर्तव्यबुद्धी किती असेल, कठोर घेतले व्रत, क्षणाक्षणाला जळत जळत, आयुष्य पुरे देऊन टाकत,— तिच्यामुळे कळे खरा, आयुष्याचा अर्थ निराळा, अंगोपांगी झिजत झिजत, मंद अगदी तेवते वात,–!!! ज्योत दिसे कळीगत, सारखा त्यातून प्रकाश स्फुरत […]

सांसारिक प्रवास

भातुकलीच्या डावांत मांडला, संसार राजा राणीचा,— इवल्याशा घरात चालला, सांसारिक प्रवास त्यांचा,–!!! छोटी छोटी भांडी कुंडी, छोटे छोटे सामान, इवली इवली सामुग्री, करत सुख-रसपान, –!!! हळूहळू संसार वाढला, आले सोनुले बाळ, कळले नाही कधीच, किती निघून गेला काळ,—!!! राजाराणी मग्न आपुल्या, छोट्या चिमुकल्या विश्वात, बाळ बालीश,वाढे निरंतर, त्याला तारुण्य आले झोंकात,-!! नादातच तो आपल्या राही, वाहन […]

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी,  अस्थिर आम्ही जगू शकतो अस्थिर आहे जग म्हणून,  स्थिर आम्ही जगू शकतो….१ पोटासाठी वणवण फिरे,  शोधीत कण कण अन्नाचे थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे….२ धरणी फिरते रवि भोवतीं,  ऋतूचक्र हे बदलीत जाते जगण्यामधला प्राण बनूनी,  चैतन्य सारे फुलवून आणते….३ पूरक बनती गुणधर्म परि,  स्थिर असतो वा अस्थिर ते विश्वचक्र फिरवित […]

अंकांची नवीन पद्धत

अंकांची नवीन पद्धत.. संदर्भ – बालभारती चें गणिताचें नवीन पुस्तक व सर्वत्र सुरूं असलेली चर्चा… ही नवीन पद्धतीच्या अंकलेखनाची बाब काय आहे हे जर कुणाला माहीत नसलें तर, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊं या. बालभारतीच्या नवीन पुस्तकात अंक लिहायची अशी नवी पद्धत दिलेली आहे. “वीस एक एकवीस”, “वीस दोन बावीस” वगैरे. या पद्धतीवर बर्‍याच लोकांचा आक्षेप आहे. […]

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]

कोट

मला या लग्ना -कार्या बद्दल काही मूलभूत प्रश्न आहेत. जसे लग्नातले भटजी दाढी का करत नाहीत?, (हल्ली भटजीला एकटं वाटूनये म्हणून नवरदेव पण दाढी ठेवतात म्हणे !),अश्या कर्यात, बहुतौन्श बायका निळ्या रंगाच्या साड्या का घालतात? वगैरे वगैरे. तसेच लग्ना – कार्यात, पिवळा किंवा मोतिया रंगाचा नेहरू शर्ट आणि विजार घालून उगाच मांडवात लुडबुड करणाऱ्यांची एक जमत […]

ताई माझी मोत्यांची माळ ग

ताई माझी मोत्यांची माळ ग, घाल तुझ्या गोऱ्यापान गळां ग, टपोरे पाणीदार छोटे मोती ग शोभतील तुझ्या कसे कंठी ग, ताई तू अशी सौंदर्यवती ग, देखणी म्हणू, लावण्यवती ग, सुकुमार तू जशी, फुलवंती ग, जशी टवटवीत जास्वंदी ग, आखीव रेखीव – ठाशीव ग, जसे एखादे शिल्प-कोरीव ग, मज वाटे तुझा अभिमान ग, बघती तुला आ वासून […]

‘अभंगवारी…!!’

आषाढ सुरु होतो तोच वारी चे वेध घेऊन…!! आम्ही सुद्धा गेलो होतो वारीला…!हे दुसरं वर्ष आमचं!! नोकऱ्या… शाळा कसं काय जमणार २१ दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला वैगरे सारखे प्रश्न गेल्यावर्षी पासून अडगळीत गेले ते गेलेच…. माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा !!! अहो…जिथे जगतनियंता पाठीशी उभा तिथे इतर चिंता उभ्या राहतायत होय ? हां […]

1 86 87 88 89 90 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..