मनांत घर केलेलं तरंगतं अदभुत खेडं – पेरु – उरोस
चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची. […]