ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन
संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला. […]