लेखक होण्यास काय लागतं ?
तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला ‘लेखक’ होण्याची लहानपणापासूनच मोठी हौस होती. (म्हणजे अजूनही आहेच! तसे आम्ही याबाबतीत, मराठीत चिवट, आणि इंग्रजीत ‘नेव्हर गिव्ह अप’ मधले.) पण लेखक व्हायला काय लागते? या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता, पन्नाशी कधी उलटून गेली कळलच नाही! […]