नवीन लेखन...

कर्ममुक्ती

न राही तुमचे ते कर्म,  ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१, प्रत्येक घटनेचे अंग,   त्यात मुख्य ईश्वरी भाग….२ तुमच्या मार्फतच होई   त्याचा इशारा कोण पाही….३, सर्व समजे मीच केले   अहंकाराने मन भरले….४, षडरिपू असे साधन   खेळविता यावे म्हणून…५, राग,लोभ, मोह मायादी   ठेवती वाटते आनंदी….६, परि याच्याच शक्तीने   प्रभू खेळ चाले युक्तीने….७, षडरिपू सारे टाळून   मुक्ती मिळेल खेळातून…..८   […]

संगीतकार रवी

ओपी माझा फेवरीट संगीतकार असला तरी रवीच्या संगीताने प्रभावित केल होत साहजिकच रवीने संगीत दिलेले सिनेमा पाहणे रवीची गाणी ऐकणे सुरु झाले…… त्या काळी प्रत्येक संगीतकाराचा अनेक वाद्यांनी युक्त असा मोठा ऑर्केस्ट्रा असे त्यातुलनेत रवीचा ऑर्केस्ट्रा लिमिटेड वाद्यांचा होता. आपल्या संगीतात त्याने प्रामुख्याने शेहनाई,संतूर व गिटार ह्यांचा वापर केला आणि साध्या सोप्या वाटणार्या पण लक्ष वेधून घेणाऱ्या  अशा गीतांची रचना केली. […]

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

मन अथांग सागर

मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा, मन आवर्तनी भोवरा, सखोल पाणथळाचा, –||1|| मन बिंदूंचे अवकाश, विस्तीर्ण मन पसरट, भावनांचे उठती कल्लोळ, अतुल आणि अलोट,–||2|| मन पाण्याचा डोंगर, एकावर एक पार, शुभ्रतम* भासे चढ, *निळसर पण उतार,–||3|| मन किरणी प्रभाव, झेलत साऱ्या दिनभर, सोनेरी कलत, झुकत, आभाळ उदंड त्यावर,–||4|| मन समुद्री वादळ, वारे अखंड वाहत, जीवाची नौका चालण्या, […]

गांधीजयंती ची सफाई मोहीम ! ( नशायात्रा – भाग १३ )

पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ? […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी, विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी, उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या […]

गांधी….आबे समजून त घ्या आंधी।

मुके बसा कायी सांगु नोका मायीत हाये आमाले। गांधी बाबा चा..किती.. पुळका हाये तुमाले। कायी सांगु नोका.. ते गांधी बाबा चे तीन माकडं। तुमचं न त्यायचं त भल्ल हाये वाकडं। बस झाले तुमचे ते सूत अन चरखे। मायीत हाये..गांधीजी किती आपले न परके। कायी सांगू नोका..की गांधीजी हात नोटावर। रोज लावता थुका… घेऊन दोन बोटावर। कायी […]

डॉ. विशाखा घालते – प्राचीन वास्तू संवर्धनाचा जागर

आधुनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण देता देता मध्यप्रदेशातील दुर्लक्षीत प्राचीन वास्तु संवर्धन व त्याच्या इतिहास जागृति चा जागर नागपुरच्या प्रो.डॉ. विशाखा कवठेकर घालत असुन तिच्या जागरणाने अनेक गड, किल्ले, महाल, वाडे, मंदीर, तलाव, बावड्या आजघडीला संरक्षित झाल्या आहेत. […]

1 2 3 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..