नवीन लेखन...

थोडे राहून गेले …

लिहिले आजवर खूप, काही राहून गेले बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …   रोज सकाळी घाईत चेहरा पाहून जाई थकून येतो बाळ जेव्हा झोपून जाई असाच झालो मोठा डोळे सांगून गेले बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …   कष्ठ उपसले आईची त्या कदर होती लाड पुरवले बापाने ती उधार होती हात फिरवला जेव्हा डोई कळून आले […]

संगीत राधामानस च्या निमित्ताने…

कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे . तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे . […]

मोहरली ही लेखणी (ओवीबद्ध रचना)

मोहरली ही लेखणी काव्यात नित्य रमली लेखणी माझी देखणी काव्य सुमे स्फुरली ।।१।। परखड बोलते ही शब्दवार करते ही झरझर स्त्रवते ही जहाल वाटते ही ।।२।। तोलून मापून भाव योजून मोजून घाव व्यक्त होई भरधाव जपूनच हो राव ।।३।। अग्रलेख नित्य लिही कधी ललित लेख ही भारुड,गवळण ही रचे छान ओवी ही ।।४।। सौ.माणिक शुरजोशी नाशिक

बामण भट कढी आंबट ! (नशायात्रा – भाग ६)

माझे वडील रेल्वेत नोकरीस होते व आम्ही सुमारे २० वर्षे नाशिकरोड येथे रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होतो . तेथे फक्त एकदोन कुटुंबे ब्राह्मणांची होती इयत्ता पहिली पासून मला आसपास खेळण्यासाठी सर्वच जातीधर्मातील मित्र मिळाले, समाजात खोल वर पसरलेला जातीभेद मी तेव्हापासून अनुभवतो आहे तेथे एखाद्या मुलाचा त्याच्या माघारी त्याचा उल्लेख तो गवळ्याचा , तो न्हाव्याचा , धनगराचा , बामनाचा , वाण्याचा असाच होत असे अर्थात प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर असा उल्लेख क्वचितच होई … […]

देर भी और अंधेर भी?

मुळात, कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी नुसता कायदा कठोर असून चालत नाही, तर कायदा बनविणारे आणि राबविणारे हातही प्रामाणिक आणि निष्पक्ष असावे लागतात. आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होईलच. हा धाक गुन्हेगाराच्या मनात निर्माण व्हायाला हवा. तेंव्हा कायदा अशा प्रकाराला काही प्रमाणात रोखू शकेल. पण सध्या तेच होत नाहीये. […]

आनंदमय जाग

हलके हलके निशा जावूनी,  उषेचे ते आगमन होई निद्रेमधल्या गर्भामध्यें,  रवि किरणांची चाहूल येई…१, त्या किरणांचे कर पसरती,  नयना वरल्या पाकळ्यावरी ऊब मिळता मग किरणांची,  नयन पुष्पें फुलती सत्वरी…२, जागविती ते घालवूनी धुंदी,  चैत्यन्यमय जीवन करी हा जादूचा तो स्पर्श असूनी,  न भासे ही किमया दुजापरी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४९७९८५०  

जीवनाचा रणगाडा

‘मुंबई ‘….. तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे  जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान  पेलून  सक्षम पणे  मार्गक्रमण  करण्याची  जिद्द  येथील  मनुष्याला  असते. […]

दान

दान मागावं मागावं दान भक्तीच मागावं। दान द्यावं ते द्यावं दान नेत्राचं द्यावं।। दान मागावं मागावं दान माणुसकीचं मागावं। दान द्यावं ते द्यावं दान रक्ताचं द्यावं।। दान मागावं मागावं दान प्रेमाचं मागावं। दान द्यावं ते द्यावं दान अर्थाचं द्यावं।। दान मागावं मागावं दान सन्मानाचं मागावं। दान द्यावं ते द्यावं दान वस्त्राचं द्यावं।। दान मागावं मागावं दान […]

अंतरपाट (लघुकथा)

अंतरपाट धरताच भुतकाळात रमण्यामागचं कारणही तसच होतं. कारण हा अंतरपाट “श्रीमंतीचा ताणा”आणि “गरिबीचा बाणा”ह्या धाग्यांनी गुंफला होता.कालिंदीच्या बाबांच्या उदात्त विचारसरणीमुळे श्रीमंत-गरीब ही दरी भरून निघाली होती. […]

सय माहेराची (ओवीबद्ध रचना)

सय माहेराची येते मन झुलते झुलते क्षणात माहेरी जाते मी तिथेच रमते।।१।। आहे प्रेमाचे आगर तिथे मायेचा सागर घडे प्रितीचा जागर हा बंधू भगिनीत।।२।। हे केवड्याचे कणीस सुगंध रातराणीस बकुळ माळे वेणीस परसदार खास।।३।। मित्र मैत्रिणींचा मेळा जमतो ना वेळोवेळा झिम्मा फुगडीही खेळा हा मैत्रीचा सोहळा।।४।। आई माझी सुगरण करी पुरण वरण मिळे स्वादिष्ट भोजन अगत्याचे […]

1 8 9 10 11 12 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..