कुठे कशी भेटू तुला
कुठे कशी भेटू तुला, घर भरले पाहुण्यांनी, चोरटी ती पहिली भेट, गेली मला थरथरवुनी ,!! होता आपुली नजरानजर, माझी न राहिले मी, दुसरे काही नसे डोळ्यात, जीव कातर कातर होई,–!!! घर अपुरे पडे आता, जरी असे ते दुमजली, स्वतःचाच नसे पत्ता, तुलाच शोधे ठिकठिकाणी–!!! साजिरी मूर्त बघता, अंत:करण फुलून येई, आत होते चलबिचल, छळते जिवाला अस्वस्थता,–!!! […]