नवीन लेखन...

लोकशाही सत्ता हवी

लोकशाही सत्ता हवी लोकशाही राज्य भारताने स्विकारले लोकहो टिकवा हे सुराज्य इथे चालवतो पंच वार्षिक योजना नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो बेधुंद जनता हानीकारक देशास निर्बंधच फायदा असता हाव नको नुस्ती राजकारण्या खुर्चीची त्यास समाजसेवेची पुस्ती करू नका इथे जाळ-पोळ,दंगा-धोपा जिथे शांती लोकशाही तिथे कर्तव्य नी हक्क दिले ना संविधानाने पाळता होतील सारे थक्क सौ.माणिक शुरजोशी […]

राधा – कृष्ण – सोल मेट्स

काळजांचे गुंफीत धागे, प्रीत आपुली जडे, कृष्णावर राधा भाळे, गोकुळास किती वावडे,–!!! सोडून मी आले , सारे घरदार अन् बाळे, सोडला संसार सारा, प्रेम केले रांगडे,–!!! कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत, तन मन माझे अनावृत्त, अनयाला ही जणू सोडले, हरीशी जेव्हा झाले अद्वैत,–!!! मन, काळीज, अंतर, हृदय, सारे काही त्यास दिले, आता, नाही काही उरले, आत्म्याने आत्म्यास […]

चरावस्था

बाल्यावस्था रम्य कसे रमतांना मौज असे सरतांना बालपण येई मना दडपण हा किशोर अवघडे कुतूहल मनी दडे नाना प्रश्न येता मनी ओथंबला तारुण्यानी तरुणाई मस्तीतली नवलाई धुंदीतली जिरे रग तरुणाची चाहुलही वार्धक्याची वार्धक्य हे विरक्तिचे अवलंबी निवृत्तीचे दुखे-खुपे भय साचे दुखण्याने वृद्ध खचे पुर्ती करा कर्तृत्वाच्या चारीवस्था महत्वाच्या सौ.माणिक शुरजोशी नाशिक

बेवड्याची डायरी – भाग ३ – सुटकेसाठी बैचैन

चहा घेऊन झाला तसे मी लघवी ला जाण्यासाठी उठलो तर एकदम अशक्तपणा जाणवला .. तो मघाचा मुलगा लगेच पुढे झाला आणि त्याने माझा हात धरला ..मला ते आवडले नाही ..मी काही लगेच पडणार नव्हतो .मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याल सांगितले मला बाथरूम ला जायचे आहे ..त्यावर त्याने सरळ कोपऱ्याकडे बोट दाखवले ..मी सावकाश तिकडे जाऊ लागलो तेव्हा आसपासचे बरेच लोक माझ्याकडे पाहत होते […]

मग्न असलेले जग

मलाच वाटे – – जग मजलाच हांसते विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  —   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा […]

निरांजनात मी ज्योत

निरांजनात मी ज्योत,अखंड सारखी तेवत, पुढे माझा भगवंत, नतमस्तक मी राहत,–!!! मी समईतील वात, झिजत राहते सतत, चाल माझी मंद-मंद, उजेडाचे रक्षण करत,–!!! मी पणतीतील ज्योत, मंद तरीही ठळक, तमाला मात देत, सर्वांना मार्ग दाखवत,–!!! चिमणीतली मी ज्योत, इवलीशी पण काम करत, धीमी – धीमी प्रकाशत, भोवताल थोडा दाखवत,–!!! मी घरातली लेक, वाढले लाडांकोडांत, तेज माझे […]

शेतकरी राजा

शेतकरी राजा आहे जगाचा आधार भुकेचा भार त्याच्यावरी ….. १ पुण्यवान राजा खळगी भरवी पोटाची सार्‍या जगताची एकटाच ….. २ गाळूनी घाम त्यानं फुलवलं रानं पिकविलं सोनं शेतामध्ये …. ३ शेताच्या बांधाला खातो चटणी भाकर लागते साखर घामामध्ये ….४ धरणीचा लेक करी काळ्याईची सेवा पिकवितो मेवा जगासाठी. …. ५ करी परोपकार ह्या सार्‍या जगावरी स्वर्ग भूवरी […]

श्री गणपतिस्तोत्रम् – भाग २

आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत. […]

विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू

विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू , तो तर केवळ एक थेंब ब्रम्हांड सारे मोठा सिंधू ,–!!! असे असता गर्व करी, नको इतका अहंकार करी, हातात नाही काही तरी, उगीचच मिशीवर ताव मारी,–!! मेंदू केवढा, बुद्धी केवढी, आचार-विचार मात्र वेगळे, संस्कारांच्या नावाखाली, पोकळ बढाया मारती सगळे,–! हातात नाहीत पुढचे क्षण , काय घडेल त्याचा नेमच नाही, […]

1 12 13 14 15 16 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..