पंख फुटता !
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०