मैत्रीचे नाते (हायकू)
हायकू -मैत्रीचे नाते मैत्रीचे नाते हे युगानुयुगाचे बालपणीचे लुटू पुटूचे रुसण्या-फुसण्याचे जिवा-भावाचे वर्ग मित्राचे नाते वर्गा-वर्गात हे फुलायचे यौवनातले नाते हळूवार असे हो मैत्रीतले सुख -दु:खाचे नाते गाढ मैत्रीचे ते जपण्याचे — सौ.माणिक शुरजोशी.