आईच्या संगत बसलो उन्हात
आईच्या संगतबसलो उन्हात, बाहेर उबेत, थंडी घरात, सकाळचा प्रहर, जीवास आराम, नाही काम धाम, बसलो निवांत, बागेच्या फाटकात, अवधान ठेवत, आईचे संरक्षण, मग काय वाण-? मला ते मिळत, मी निर्धास्त,–!!! आई बिनधास्त, नाही डरत, लोक घाबरत, मी हसत,–!!! कवडसा उन्हात, त्यात खेळत, जरासा थकत, आईस बिलगत,–!!! © हिमगौरी कर्वे