नवीन लेखन...

मी वाचणारच (ओवीबद्ध रचना)

मला वाचवा वाचवा नका खुडू हो या जीवा जग आम्हा ही दाखवा मी मोलाचा ठेवा।।१।। अधिकार जन्मायचा आशिर्वाद ईश्वराचा हक्क स्वप्न बघायचा का हिसकावता।।२।। मी देशाचा अभिमान हवा तुम्हा स्वाभिमान कराल माझा सन्मान प्रजा टिकवाल।।३।। जगा आणि जगू द्या हो दिवा विझता इथे हो पणती कामा येई हो तिला जगवा हो।।४।। मी धडपडणारच मी जगी वाचणारच […]

डाग!

कितीही देशी शीतल चांदणे आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच ब डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]

संक्रांत

तिळगुळाचा सण स्नेहाचा संक्रांती सण महाराष्ट्राचा पतंग उडे नभात सडे पतंगाचेच युद्धची झडे ही काटाकाटी नी वाटाघाटी मौजची भारी प्रितीची दाटी सौ.माणिक शुरजोशी नाशिक १३/१/२०

रामास शोधण्या मी

रामास शोधण्या मी धामास जात नाही धोंड्यास मानने हे माझ्या युगात नाही   देवास भेटण्याला गर्दी जमाव सारा त्या माणसातली तीमा झी जमात नाही   तीर्थास लोक जाता देवास मागता ते तीर्थामधील देवा ऐकूच येत नाही   कित्येक सोसले मी घावास पोसले मी धावून संकटी तो काळास येत नाही   शोधावयास देवा मी माणसात गेलो तेथेच […]

सुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची

गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते?.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे. […]

परिवर्तन

नित्य नेमेची पावसाळा पुन्हा हिवाळा उन्हाळा परिवर्तन नियम सृष्टीचा विविधतेचा गोतावळा ।।१।। विविधतेचा गोतावळा परिवर्तित होतो डोलारा फुलताच लतिका साऱ्या जिथे तिथे फुले फुलोरा ।।२।। जिथे तिथे फुले फुलोरा तंत्रज्ञानाने जीवन बदला जुने असतेच सोने हो नव्यात हिरा असे दडला ।।३।। नव्यात असे हिरा दडला म्हणून जुन्याचा हट्ट सोडा परिवर्तनात हित साधा जुन्या बरोबर नविन जोडा।।४।। […]

कन्या रत्न हे जन्मता

कन्या रत्न हे जन्मता सदा असावे स्वागता जाईची रे भासे कळी ह्या अंगणामध्ये ती रांगता का खुडता रे सुगंधी कळी तीचं नशिब असे तीच्या भाळी का रक्ताने हात माखता घेऊन तो निष्पाप बळी आई म्हणजे ईश्वर असे मुलीमध्ये तो का न दिसे भावी जगाची तीच आई उमटते सोनपावलांचे ठसे शिवा जन्मला जिजा पोटी सावित्री झाली क्रांती […]

जेव्हा लेखणी बोलते

(१) जेव्हा लेखणी बोलते भाव मनीचे सांगते सत्य प्रकाशी करते नवे साहित्य योजते (२) जेव्हा लेखणी बोलते शस्त्रा सम ती भासते गुपित उलगडते मनीची व्यथा मांडते (३) जेव्हा लेखणी बोलते साहित्य शब्दी डोलते अंतरंगी झेपावते स्वैर नभी संचरते (४) जेव्हा लेखणी बोलते शब्दबाग फुलवते स्व-गंधी दरवळते सारस्वतात धुंदते (५) जेव्हा लेखणी बोलते काव्यसरिता वाहते हक्कासाठी ती […]

1 7 8 9 10 11 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..