तोहफा ..तोहफा …लाया .लाया ..लाया …! ( नशायात्रा – भाग १५ )
एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले . […]