नवीन लेखन...

पाषाणाच्या देवा

हादरून गेलो मनात पूरता,  ऐकून त्याची करूण कहानी केवळ एका दु:खी जीवाने,  हृदय दाटूनी आणीले पाणी असंख्य सारे जगांत येथे,  प्रत्येकाचे दु:ख निराळे सहन करिल का भार येवढा,  ऐकूनी घेता कुणी सगळे सर्व दुखांचा पडता डोंगर,  काळीज त्याचे जाईल फाटूनी कसाही असो निर्दयी कठोर,  आघात होता जाईल पिळवटूनी मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां […]

विकासनीतीचा महाविजय !

राजकारण विकासाच्या मुद्दयांवर चालतं कि भावनिकतेवर? या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलं तर शंभर पैकी किमान ऐंशी लोक जात, धर्म, तथाकथित राष्ट्रवाद आदी भाविनक मुद्यांचेच उत्तर देतील ! कारण, सध्याच्या राजकारणाची अवस्थाच तशी झाली आहे.. […]

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही? […]

रंग गुलाबी शराबी

रंग गुलाबी शराबी,गाली तुझ्या फुलले, मदनबाण नयनातुनी, पाहता-पाहता निसटले,–!!! जाई जुई कोमलांगी, नाजूक तन साचे, अंगकाठी शेलाटी, सोनचाफ्याचे फूल नाचे,–!!! वर्ण तुझा केतकी, मिठास शब्द बोले, कुंदकळ्यां नाजूकही, दंतपंक्ती जणू भासे,–!!! वाटे चालते-बोलते, फूल तू सायली, गेंद टपोरे झेंडूचे, केशरवर्खी उरोजही,–!!! जाता तू जवळुनी, मनमोगरा फुलतसे, उमलत हरेक पाकळी, जिवाचे कमळ बहरतसे,–!!! मंजुळ स्वर ऐकुनी, भोवती […]

हे वेडे प्रेम पाखरू (काव्य)

प्रेमात पडते हे वेडे प्रेम पाखरू तुझ्यावर ही प्रीत जडते //१// धुंदीत जगते मन गुंतले स्वप्नात स्वप्नी नभात ते विहरते //२// बागेत बागडे फुलावर विसावले फुलपाखरू स्वच्छंदी गडे//३// मकरंद घेण्या मन आज आतुरले फुलाफुलातुनी हुंदडण्या //४// हुंदडले अती हाती भरल्या ओंजळी मधुओंजळ करना रिती //५// प्राशी मधुरस हे प्रेम पाखरू खुश प्रित-अंगणी लागे चुरस//६// — सौ.माणिक […]

कुत्र्याला नशेची दीक्षा (नशायात्रा – भाग २० )

मला लहानपणासून कुत्रा हा प्राणी फार आवडतो , रेल्वे क्वार्टर्स मध्ये रहात असताना शाळेतून येताना एखादे छान गोंडस कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर दिसले की लगेच ते घरी घेऊन येत असे आधी आई -वडिलांचा स्पष्ट नकार , मग माझा हट्ट , रडणे वगैरे सोपस्कार झाले की शेवटी नाईलाजाने ते कुत्रा घरात ठेऊन घेण्यास परवानगी देत . […]

झीज

रात्रंदिनी कष्ट करूनी,  झिजवत होता आपले हात, जीवनांतल्या धडपडीमध्यें,  दिसे त्याची स्थितीवर मात….१ पर्वा नव्हती स्व-देहाची,  झिजवत असता हात ते जाण नव्हती परि ती त्याला,  हेच कष्ट ते जगवित होते….२, श्रम आणि भाकरी मिळूनी,  ऊर्जा देई तिच शरिराला ऊर्जेनेच तो देह वाढवी,  समाधान जे मिळे तयाला…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

सुट्टीमुळे कार्यक्षमता वाढेल का?

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे. […]

अर्थसंकल्प अंतर्गत सुरक्षेकरता समाधानकारक पण बाह्य सुरक्षेसाठी ?

देशाची अंतर्गत सुरक्षा खर्च गृहमंत्रालयाच्या बजेट मधून केला जातो. बाह्य सुरक्षेचा खर्च डिफेन्स मिनिस्ट्रीच्या बजेट मधून केला जातो. म्हणुन या वर्षी जरी संरक्षण मंत्रालयाचे बजेट फ़ारसे वाढले नसले तरी गृह मंत्रालयाचे बजेट हे पुष्कळ वाढले आहे.याचाच अर्थ अंतर्गत सुरक्षेचे धोके आणि आतल्या शत्रुंचा हिंसाचार वाढत असल्यामुळे सरकारने अंतर्गत सुरक्षावर लक्ष केंद्रित केले आहे. […]

पावसाने हलकं झालेलं आभाळ

पावसाने हलकं झालेलं आभाळ आज पक्षांनी पार भरून गेलं चिव चिव निनादली रानभर मन रानभर वार्‍यासंग हुदडलं — शरद शहारे

1 3 4 5 6 7 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..