क्षण मंतरलेले (मुक्तछंद)
मनाला भुरळ घालणारे,स्वच्छंदी बागडणारे . स्वप्नमयी दुनियेत रमणारे. पंख लावून नभांगणी विहरणारे. मोरपंखी,रंगीबेरंगी, कानात वारं भरल्यावर उनाड कोकरागत उंडारणारे. मनाला मोहीनी घालणारे. महाविद्यालयीन *क्षण मंतरलेले*. तासिका बुडवून पारावर घालवलेले . पुस्तकात पुस्तक ठेवून वेड्यागत वाचन केलेले. गाण्यांचे बोल मुखोद्गत केलेले. शेले-पागोटे चढवून स्नेहसंमेलानात हास्याचे कारंजे फुलवलेले महाविद्यालयातले हे *क्षण मंतरलेले* फिरून व्हावे का तरूण महाविद्यालयिन जगणे […]