बागेतल्या तारका
बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १ बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २ अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३ शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४ गेल्या निघूनी सर्व तारका आकाशाला सोडूनी शोधूं लागले […]