शबरीचे निर्मळ प्रेम
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी ।।धृ।। व्याकूळ होती राम भेटी रात्रंदिनी नाम ओठी नाचूनी गाऊनी भजन करी ।।१।। ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी बोरे जमवित चाखूनी वेचली अंबट तुरट दूर फेकली भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी ।।२।। ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी उष्टी बोरे प्रभू चाखती शोषूनी त्यातील रसभक्ती शबरी […]