नवीन लेखन...

करोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी

करोना व्हायरसचा भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला,या अभ्यासामध्ये अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावरती विचार करून आवश्यक पावले पण उचलत आहे. […]

छुन्नुक छुन्नुक (दोन शब्दी)

छुन्नुक छुन्नुक, पैंजण वाजती, थिरक थिरक, पावले नाचती, प्रेक्षक आपुले, भान विसरती, नृत्याच्या तालावरी,—- रेषेला मिळे, रेषा आणखी, कसब आपुले, चित्रकार दाखवी, प्रतिमा काढे, कशी हुबेहूब, बोटांची जादुगिरी,—- कंठातून मंजुळ, सुस्वर निघती, मधुर गायने, मंत्रमुग्ध होती, तालबद्ध गाणे, गायिका गाई,—- सहजसुंदर अभिनयाची, श्रेष्ठ अदाकारी, पाहून सर्वांचे, डोळे पाणावती, नाट्यकला आगळी,—- अन्न सुग्रास, सुगरण पकवी, चोचले जिभेचे, […]

जुन्या गोष्टींमधले नवे आणि नव्यातले काही जुने

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो. […]

 प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।   शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना  ।।२।।   तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी  ।।३।।   आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत, सेवा शक्ति मला […]

हेल्पलेस

अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १६

दग्धिस्तिभि: कनकुंभमुखावसृष्टिस्वर्वाहिनी विमलचारूजलप्लुताङ्गीम। प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथगृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।१६।। दग्धिस्तिभि:- पुराणांतील अनेक संकल्पना पैकी संकल्पना आहे दिग्गज. पृथ्वीच्या आठ दिशेस हे आठ हत्ती असतात. त्यांच्या आधारावर पृथ्वी स्थिर असते. ही संकल्पना प्रतिकात्मक आहे. सगुण-साकार गोष्टीला जग म्हणतात. याच्या विपरीत निर्गुण-निराकाराला गज असे म्हणतात. अर्थात बाहेरून निराकार तत्त्वाच्या आधारे, सामान्य शब्दात निराधार स्वरूपात पृथ्वी असते. प्रतीकरूपात स्वीकारलेले गज […]

देशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…!

भारत सरकारने कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. केंद्र सरकारने या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीर उपाय व जनजागृती युध्द पातळीवर हाती घेतली आहे. सध्या एकतीस मार्चपर्यंत निर्बंध जारी केले आहेत. शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी जारी केली आहे. सर्व गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई म्हणजे गर्दी हे समीकरण आहे. म्हणून गरज नसेल तेव्हा बाहेर पडायचे नाही, हे पथ्य लोकांनी आपणहून पाळणे महत्वाचे आहे. […]

रात्र सामोरी येतां

रात्र सामोरी येतां, मन कसे कोमेजते, मावळतां दिन सारा, काळोख घेऊनी येते, दिवसाचे तास संपती, असे बघतां-बघतां, स्मृतींच्या इंगळ्या डसती, *संधिप्रकाश* ओसरतां, काळजाचे धागे तुटतां, जिवां हुरहूर लागे,— फक्त “काहूर” तेवढे, मनांत होते जागे,–!! अंधाराची सोबत न्यारी, कुणां अश्रू ना दिसे, आपुल्याच,–रात्री वाटती,– कसे ऋण” फेडायाचे,? सुख–दु:खांचे,हिशोब सारे, नकळत आपुले मन मांडते, सरशी’ कुणाची होते हे, […]

 लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला,  विनवितो मी तुझाच पूत्र  । बाबा माझे नसती हयात,  कोण मजला ह्या जगतात  ।। ‘केशव’ माझे वडील असता,  ‘केवशसूत’  हा ठरतो मी  । तसाच बनता  ‘केशवकुमार’,  मोठे होण्याची युक्ती नामी  ।। जगावयाचे जर मोठ्या नामी,  तूच मजला महान आहे  । ‘लक्ष्मी’  तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे  ।। डॉ. भगवान नागापूरकर […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १५

सरसिजनिलये सरोज हस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे।भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।१५।। आई जगदंबेला प्रसन्नतेची प्रार्थना करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री तिचे गुण वैभव वर्णन करीत आहेत. ते म्हणतात हे आई जगदंबे! तू कशी आहेस ? तर, सरसिजनिलये- सरसिज म्हणजे कमळ तर निलये म्हणजे निवास करणारी. आई जगदंबा कमळात निवास करते. इथे केवळ एका फुलाचा विचार नाही. ते प्रतीक आहे. कमळ […]

1 2 3 4 5 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..