जन्मच जर सोसण्यासाठी
जन्मच जर सोसण्यासाठी, तर दुःख कशाचे करावे,–? आयुष्याला तारण्यासाठी, का सुखाचे आधार घ्यावे,–? इथे कुणी ना आपल्यासाठी, कळवळून मग काय मिळवावे, फक्त मग जगण्यासाठी, शरीरही का झिजवावे,–? थोडा उजेड दिसण्यासाठी, कितीदा डोळे मिटून घ्यावे, पार अंधारा करण्यासाठी, सतत सारखे ठेचकळावे, जखमी मन लपवण्यासाठी, जिद्दीला किती उभारावे, घायाळ जिणे झाकण्यासाठी, डोळेझाक करत राहावे, येतो तो वार करण्यासाठी, […]