श्री कनकधारा स्तोत्रम् – ७
प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमाथिनि मन्मथेन। मय्यापतेत्दिह मन्थर मीक्षणार्द्धं मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।७।। प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्- पद शब्दाचा अर्थ स्थान. प्राप्त म्हणजे उपलब्ध होणे. प्रथमतः अर्थात पहिल्याच वेळी. किल यत्प्रभावात् अर्थात तिच्या प्रभावामुळे. मांगल्यभाजि- अर्थात सकलम मंगलाचे पात्र, अधिष्ठान असणारे. मधुमाथिनि- मधु नावाच्या दैत्याचे मथन अर्थात विनाश करणारे जे भगवान विष्णू त्यांच्यात, अर्थात […]