श्री भ्रमरांबाष्टकम् – ७
९८) श्री भ्रमराम्बाष्टकम्-७धन्यां सोमविभावनीयचरितां धाराधरश्यामलां मुन्याराधनमेधिनीं सुमवतां मुक्तिप्रदानव्रताम्। कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां काञ्चीलसन्मध्यमां श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।७।। धन्यां – धन्य असलेली. धन्यता ही जीवनातील अशी एक सुंदर अवस्था आहे की जेथे काहीही मिळवायचे बाकी नसते. कृतार्थ. सार्थक. आई जगदंबा तशी आहे. सोमविभावनीयचरितां- सोम म्हणजे चंद्र. विभावनीय अर्थात सुंदर. चरित अर्थात चारित्र्य. आचरण. आई जगदंबेची प्रत्येक लीला चंद्राप्रमाणे शुभ्र, प्रसन्न […]