नवीन लेखन...

चला बदल घडवू या…

सार्वत्रिक जीवनात जगताना आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून आपल्याला हे जाणवत जातं की हा कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गोतासाठी काळ ठरत आहे. पण आपली देखील गंमत अशी आहे, की आपण फारसे बंड करून उठत नाही. फारसे विरोधात बोलत नाही. सर्वसामान्यांची जी ताकद आहे, ती एकजुटीने वापरली गेली तर निश्चितपणे बदल घडेल यात शंका नाही. […]

श्री भ्रमरांबाष्टकम् – ५

श्रीनाथादृतपालितत्रिभुवनां श्रीचक्रसंचारिणीं।दीनानामतिवेलभाग्यजननीं दिव्याम्बरालंकृतां श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।५।। श्रीनाथादृत- श्री म्हणजे देवी लक्ष्मी.तिचे नाथ म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्याद्वारे आदृत म्हणजे आदर व्यक्त केला आहे अशी. पालितत्रिभुवनां- स्वर्ग, मृत्यु ,पाताळ अशा तीनही भुवनांची पालन कर्ती. श्रीचक्रसंचारिणीं- शाक्त उपासनेत श्री यंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्या यंत्रात विद्यमान समस्त देवतांच्या ठिकाणी विद्यमान चैतन्यशक्ती. यानंतरचे विशेषण शांतपणे समजून घ्यावे लागेल. ज्ञानासक्त- ज्ञान […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ६

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं. […]

वाऱ्यावरती हाले डहाळी

वाऱ्यावरती हाले डहाळी, जगाची पर्वा न करत, सृष्टीच्या या साम्राज्यी, डहाळ्या अशा अगणित,— बहरलेल्या असती पानांनी, त्यामुळेच फुलेही येत, जोपासना करत त्यांची, झाडे, वृक्ष उभे राहत,—– दिनभर झळ सोसत उन्हाची, झाड तिचे रक्षण करत, जिथून फुटे हर एक डहाळी, ठेवे त्यांना अगदी अलगद,—- फळां-फुलांनी लगडलेली , मस्त -मौला दिसे डहाळी, निसर्गाचेच छोटे मूल, असूनही सतत झुके […]

 आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

धोक्याची घंटा !

सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. […]

श्री भ्रमरांबाष्टकम् – ४

षट्तारां गणदीपिकां शिवसतीं षड्वैरिवर्गापहांषट्चक्रान्तरसंस्थितां वरसुधां षड्योगिनीवेष्टिताम्। षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां ष़ड्भावगां षोडशीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।४।। षट्तारां – हा शब्द समजून घेण्यासाठी थोडी कसरत करणे आवश्यक आहे. षट्तारा म्हणजे सहा ताऱ्यांचा समुदाय. असा समुदायास असतो कृतिका नक्षत्राचा. त्या सहा कृतिका देवसेनापती कार्तिकेयाच्या माता. श्री कार्तिकेय म्हणजे स्कंद हे देवी पार्वतीचे पुत्र. ती देवी पार्वतीच सर्व रूपात नटली असल्याने, कृत्तिका […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ५

“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?” दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले…. […]

दवबिंदुंचा थेंब पाहे

दवबिंदुंचा थेंब पाहे,प्रतिबिंब फुलाचे पाण्यात, पाणी का आरसा आहे, प्रश्न पडे त्यास मनात,–!!! रंग पाहून पाण्याचे, थेंबही भासे कसा रंगीत, विविधढंगी रूप असे, पाहून त्याचा जीव चकित,–!!! फूल कसे निडर असे, रंग त्याचे ना बदलत, पाणीच आपुले रंग बदले, प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,–!!! आखीव-रेखीव पाकळ्यांचे, बाल- स्वरूप दिसे पाण्यात, थेंबात परागकण मोठाले, सारे थेंबाच्या आत डोकावत,–!!! […]

माझं मैत्र

अरे हे मैत्र मैत्र काय असतं? अरे हे मैत्र मैत्र काय असतं? मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या दुधावरची साय असतं तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं अरे हे मैत्र मैत्र काय असतं? बऱ्याच वर्षांनी अचानक शाळेतील क्रश समोर दिसताच हृदयाच्या आतून उमटलेले हाssssय असतं तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता हसून केलेलं हाय असतं अरे हे […]

1 9 10 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..