नवीन लेखन...

 चंद्र डाग

हे शशिधरा तूं प्रेमळ सखा    साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी    राजा तूं नभाचा   लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी    काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती    तू डागाळला   डाग कसला तुम्ही मानतां    प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते   हे आम्हीं विसरतो   समजूं शकतो नीती बंधन    समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही    म्हणावे पापाचे   गुरू […]

निमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक

इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही. […]

काळाचा पडदा

काळाचा हा पडदा इतका गडद, गहिरा आहे, पण तो न दिसणाराही आहे… आपण उद्या कधीच पाहू शकत नाही.. ओशो रजनीश म्हणतात, ‘आज वही कल है, जिस कल की फिक्र तुम्हे कल थी…!’ […]

श्री भ्रमरांबाष्टकम्- ३

राजन्मत्तमरालमन्दगमनां राजीवपत्रेक्षणांराजीवप्रभवादिदेवमकुटै राजत्पदाम्भोरुहाम्। राजीवायतमन्दमण्डितकुचां राजाधिराजेश्वरीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।३।। राजन्- शोभासंपन्न असलेली, मत्तमराल- आपल्याच आनंदात डौलत जाणारा मराल म्हणजे हंस. मन्दगमनां – त्याप्रमाणे मंद गती ने गमन करीत असलेली. राजीवपत्रेक्षणां- राजीव म्हणजे कमळ. त्याचे पत्र अर्थात पाकळी प्रमाणे, ईक्षणा म्हणजे दृष्टी अर्थात डोळे असणारी. राजीवप्रभवादि- राजीव अर्थात कमळातून ,प्रभव अर्थात उत्पन्न झालेले. म्हणजे भगवान ब्रह्मदेव. भगवान […]

लावूया जाणिवांचे दिवे !

कोरोनाविरोधातील लढ्यात देश आज निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असताना कुठलंही अविवेकी वर्तन निर्धाराला तडा देणारे ठरेल. त्यामुळे सरकार म्हणून बोलताना प्रत्येकाने जबाबदारीची व्यापक जाणीव ठेवून बोललं पाहिजे. नागरिकांनीही कर्तव्याच्या जाणिवा जोपासण्याची गरज आहे. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ४

आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??….. […]

दवाचा शिंपीत सडा

दवाचा शिंपीत सडा, पहाट उमलत आली, खेळ संपता तमाचा पृथ्वीवर बागडू लागली,–!!! पाने सारी भिजता, झाडांना निराळी टवटवी, रंग उठून दिसता, वाटते विलक्षण तरतरी,–!!! रस्ते थोडे भिजता, अवनीला येई तरारी, येऊ घातला भास्करराजा, आंस तिच्या किती उरी,–!!! भिजत्या भिजत्या पाकळ्या, थेंबांचे डंवरती मोती, रंगीबेरंगी नाना फुलांना, कसा मस्त उठाव देती,–!!! पाकळी – पाकळी फुलता, कळीकळी ओलावली, […]

मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन

आज ४ एप्रिल म्हणजेच  महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवस. आपल्या मुलांना  बुद्धिबळ हा खेळ शिकवणे आणि त्या खेळाची गोडी  मुलांमध्ये निर्माण करणे  हि गरज लक्षात घेता “महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन” साजरा केला जातोय. बुद्धिबळ हा घरी बसून खेळता येण्याजोगा बैठा खेळ. बुद्धिबळाने  खेळाडूंना एके जागी स्थिर व एकाग्र करण्याची ताकद जणू काही सिद्ध केली आहे. सद्य परिस्थितीमधे तीच ताकद अत्यावश्यक वाटते. […]

झडी आठवणींची

आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते. […]

1 10 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..