श्री भ्रमरांबाष्टकम् – २
कस्तूरीतिलकाञ्चितेन्दुविलसत्प्रोद्भासिफालस्थलींकर्पूरद्रवमिश्रचूर्णखदिरामोदोल्ल सद्वीटिकाम्। लोलापाङ्गतरङ्गितैरधिकृपासारैर्नतानन्दिनीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।२।। आई ललितांबेच्या मुख कमलाचे सौंदर्य वर्णन करताना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, कस्तूरीतिलकाञ्चित- कस्तुरी मिश्रित तिलकाद्वारे विलोभनीय असणारे. सोळा शृंगारात शेवटचा शृंगार आहे तिलक धारण. त्या तिलका मधील सर्वश्रेष्ठ तिलक कस्तुरीचा. त्याचे वर्णन, अर्थात परिपूर्ण शृंगार केलेली. इन्दुविलसत्- इंदू म्हणजे चंद्राप्रमाणे, विलसत् म्हणजे सुंदर दिसणारे. मुखकमल. प्रोद्भासि- चमकदार […]