April 2020
श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ६
यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्॥६॥ फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत. ते म्हणतात, यः – जो कोणी, श्लोकपंचकम् इदं – हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला, सौभाग्यदं – सौभाग्य दायक असलेला, सुललितं – लालित्यपूर्ण […]
आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १
भाग एक निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे […]
आकाशाशी स्पर्धा करणे
आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे, खालून मुळ्यांची पेरणी, झाडाझुडपांचा पायाच असे, वाढावे असेच उदंड, खालून वरवर जावे, कितीही वर गेलो तरी, पायाला न कधी विसरावे, गगन विस्तीर्ण भोवती, बुंध्यातून वाढीस लागावे, फांद्या पाने ,फुले यांनी, खोडास सतत बिलगावे, झाड लेकुरवाळे असते, तरी किती निस्संग,—!!! एक निळाई त्याच्या डोळी, दुसरा न कुठला रंग ,–!!! हिरवे […]
देह समजा सोय
जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।। देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।। भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला ।।३।। देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, […]
श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ५
प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति। श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥ पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे. […]