श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ४
ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते । बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥ आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते – ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी. प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात […]