नवरत्नमालिका – ५
कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहारषड्दलसमुल्लस- त्पुण्डरीकमुखभेदिनीं च प्रचण्डभानुभासमुज्ज्वलाम् । मण्डलेन्दुपरिवाहितामृततरङ्गिणीमरुणरूपिणीं मण्डलान्तमणिदीपिकां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ५॥ आई जगदंबेच्या परमप्रकाशित, दिव्य रूपाचे वर्णन करतांना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहार- आई जगदंबेच्या कोणत्याही यंत्राच्या मध्यभागी असणाऱ्या त्रिकोण मंडल अर्थात स्थानामध्ये , कुंडल अर्थात आपल्याच आनंदामध्ये विहार करणारी, षड्दलसमुल्लसत्पुण्डरीकमुखभेदिनीं – षट्दल म्हणजे सहा पाकळ्यांचे, समुल्लसद्- प्रफुल्लित, पूर्णपणे उमललेल्या, पुंडरीक अर्थात कमळ. […]