श्री मीनाक्षी पंचरत्नम् – ५
नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं नानार्थसिद्धिप्रदां नानापुष्पविराजितांघ्रियुगलां नारायणेनार्चिताम् । नादब्रह्ममयीं परात्परतरां नानार्थतत्वात्मिकां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ५॥ आई श्रीमीनाक्षीच्या मूलचैतन्यस्वरूपी आदिशक्ती स्वरूपाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं – कर्म,भक्ती तथा ज्ञानाच्याद्वारे भगवंताशी जुळतात त्यांना योगी असे म्हणतात. जे भगवंताच्या दिव्य स्वरुपाचे मनन करतात त्यांना मुनी असे म्हणतात. अशा असंख्य योगी आणि मुनी श्रेष्ठांच्या हृदयामध्ये निवास […]