नवीन लेखन...

गौरीदशकम् – ११

प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना- द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः । वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥ या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात, प्रातःकाले – या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे. भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव […]

जगाला युद्ध नको बुद्ध हवा…..

आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. […]

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी   घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर […]

‘भूमिका’ आजोबांची !

रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.
” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. […]

गौरीदशकम् – १०

आशापाशक्लेशविनाशं विदधानां पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् । ईशामीशार्धाङ्गहरां तामभिरामां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १०॥ भगवंताचे, भगवतीचे सगळ्यात मोठे वैभव म्हणजे भक्तवत्सलत्व. आपल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणे हे जणू देवतांचे सर्वाधिक प्रिय कार्य. आई जगदंबेच्या या शरणागतवत्सल स्वरूपाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, आशापाशक्लेशविनाशं विदधानां पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् । पादांभोज म्हणजे चरणकमलांचे, ध्यान करण्यात परायण असणाऱ्या पुरुष […]

सुवर्ण पदक स्वीकारण्याचा सन्मान ! (नशायात्रा – भाग २८)

सायंकाळी हे नक्की झाले की पकडली गेलेली मुले आज काही सुटणार नाहीत .बक्षीस समारंभ ६ वा सुरु झाला , मी एकांतात जाऊन सिगरेट मध्ये गांजा भरून दम मारून मग अगदी शेवटी बसलो होतो , एकेका स्पर्धचे नाव सांगून सुवर्ण , रौप्य , आणि कास्य पदकाची बक्षीसे जाहीर केली जात होती आणि त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री . राम ताकवले यांचे हस्ते पदके प्रदान केली जात होती . […]

सत्व रज तमो गुण

त्रिभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण, स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती ।।१।।   कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।   प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती, सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येती ।।३।।   राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार, त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून ।।४।। […]

वलयांकितांच्या सहवासात – लेखमालेची ओळख

सुप्रसिद्ध शब्दांकनकार प्रा. नीतिन आरेकर यांनी घेतलेला, वलयांकित व्यक्तींच्या सर्वसामान्यांना माहित असलेल्या व्यक्तिमत्त्वापलिकडे जाऊन घेतलेला शोध….. […]

गौरीदशकम् – ९

नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका । कल्याणीं तां कल्पलतामानतिभाजां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ९॥ या जगाच्या अंतर्गत प्रवाहित मूलशक्ती स्वरूपात विश्वसंचालन करणाऱ्या आई जगदंबेच्या लीलेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका । विविध आकार धारण करून या विश्वाची केंद्रीभूत असणारी ही आई जगदंबा संपूर्ण विश्‍वाला व्यापून मुक्तपणे स्वतःच्या इच्छेनुसार एकटीच […]

मेरी मर्जी ! ( बेवड्याची डायरी – भाग २७ वा )

..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ‘ मी आज दारू पिवू का ?’ अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील …! […]

1 6 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..