बोथट बहिष्कारास्त्र ?
आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. साध्या सुईपासून ते महागातल्या महाग इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत आपण चिनी उत्पादनावर अवलंबुन आहोत. आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अभ्यास करून टाकाऊ पण आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तू विक्रीस आणून चिनी ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला विळखा मारला आहे. चीनची भारतातील गुंतवणूक डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हा विळखा तोडायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला सक्षम व्हावे लागेल. […]