ज्ञानाग्नि पेटवा
हातातील काडी घासतां पेटीवरी अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो चितांत असतो प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी लागताती संत संत हाच गुरु मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला जागवित असे उजळण्या मन घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०