श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २
अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् | हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖ कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत. आद्यं – […]