साकुरामय – जपानची गुलाबी सफर (जपान वारी)
साकुरा हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे का? असे सहज काही जपानी लोकांना विचारल्यास त्यातल्या ५०% लोकांकडून पटकन होकार मिळतो असा माझा अनुभव आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय असणारे हे साकुरा. राष्ट्रीय फूल नाही बरं का! लोकप्रियताच ती केवढी; गल्लत होते अशी मग! साकुरा सिझन मध्ये मनमुराद आदरातिथ्य करवून घेता येते. जपान देशातल्या अगणित प्रेक्षणीय जागांवरती साकुराचा आनंद आपण घेऊ शकतो. हा साकुरामय जपान पाहणे आणि अनुभवणे नक्कीच एक सुंदर आठवण देऊन जाते हे मात्र खरे! […]