निवृत्तीच्या उंबरठ्यावर !
कां व्हावे निवृत्त मी ? कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या वय झाले समजूनी कार्यक्षमता माझ्या मधली मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर निसर्गालाच हे ठरवूं द्यावे सहजची जगतो ऐंशी वर्षे संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं निवृत्तीची जाणीव येता सर्वासंगे जगता जगता शेवटचा तो श्वास ठरु दे […]