नवीन लेखन...

द अदर साईड ऑफ सोल !

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली . […]

निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्

कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते. […]

ओळख नर्मदेची – भाग २

पौराणिक महत्व: आध्यात्मिक, ऐतिहासीक, पौराणिकदृष्ट्या नर्मदा ही कुमारिका समजली जाते व तिच्या परिक्रमेला अनन्य महत्व आहे. नुसत्या नर्मदामैयेच्या दर्शनाने, स्नानाने मोक्ष मिळतो म्हणतात, ह्या तुलनेत गंगेत स्नानाने पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. फक्त गया अलाहाबादला म्रृत्यु आल्यास direct मोक्ष मिळतो. हा जरा श्रध्दा,वा अंधश्रद्धेचा भाग म्हणून सोडला तरी मोक्षप्राप्ती साठी सगळे चराचर प्राणी काशीत स्थायिक होऊन […]

सर्वस्व अर्पा प्रभुला

केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन     हीच भावना उरीं   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०     […]

जागतिक पर्यटन दिन

आज दिनांक २७ सप्टेंबर आहे. आजच्याच दिवशी १९७० रोजी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना झाली होती. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. […]

दुधामधील चंद्र

कोजागिरीची पौर्णिमा परि,  आकाश होते ढगाळलेले  । शोधूं लागले नयन आमचे,  चंद्र चांदणे कोठे लपले  ।। गाणी गावून नाचत होती,  गच्चीवरली मंडळी सारी  । आनंदाची नशा चढून मग,  तल्लीन झाली आपल्याच परी  ।। मध्यरात्र ती होवून गेली,  चंद्र न दिसे अजूनी कुणा  । वायु नव्हता फिरत नभी ,  मेघ राहती त्याच ठिकाणा  ।। दूध आटवूनी प्रसाद […]

सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. […]

1 2 3 4 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..